छोटे आणि मध्यम उपक्रम (एसएमई) हे बाजाराचे मुख्य घटक असतात. ते पुष्कळशा सेवा पुरवितात. तरीही, स्वत:चा ब्रँड विकसित करण्यात त्यांना बर्याच स्पर्धेचा सामना करावा लागतो. बरेचसे फ्रँचायसर्स त्यांचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तसेच फ्रँचाइजची चांगली छबी निर्माण करण्यासाठी फारच मेहनत घेतात.
व्यवसाय वाढविण्यासाठी फ्रँचायझिंग ब्रँड तयार करणे फारच अत्यावश्यक आहे. फ्रँचायझी आणि फ्रँचाइझ रची एसओपी पुष्कळ मार्गांनी मदतगार होऊ शकते. ह्यामुळे स्टॅटेजीज वापरण्यासाठी अधिकार्यांना एक स्पष्ट रुपरेखा मिळते.
फ्रँचायझी ब्रँड तयार करण्यासाठी विविध एसएमई-जना खालील स्टॅटेजीज उत्कृष्ट आहेत. योग्य फ्रँचायझिंग ब्रँडमुळे चांगली कस्टमर लॉयल्टी तयार होते कारण ग्राहकांच्या अपेक्षा चांगल्या रीतीने पूर्ण होतात.
ब्रँड एक्स्ट्रीमिझम टाळणे
पुष्कळसे एसएमई-ज त्यांची विश्र्वासार्हता सिद्ध करण्यासाठी ब्रँड एक्स्ट्रीमिझम ह्या अनियमित उपायांचा मुख्य आधार घेतात. कंपनीने कधीही हार्श ब्रँड मॅनेजमेंट करु नये. ग्राहकांचा बेस तयार करुन विश्र्वास राखता येतो. तसेच आपण पुरवित असलेल्या वस्तुंची प्रतही राखावी. तथापि, फ्रँचायझिंग ब्रँड निर्माण करताना एसोपीच्या कठोर मार्गदर्शनाचा संघर्ष क्रिएटिव्ह दृष्टीकोनाशी होता कामा नये.
गरजांचे शिक्षण
चांगला फ्रँचायझिंग ब्रँड तयार करण्यासाठी प्रत्येक फ्रँचाइझने योग्य वर्तन राखावे. ह्या पैलुत फ्रँचाइझ मॉडेल विकसन प्रक्रिया फार मदतीची ठरु शकते. फ्रँचाइझ सुसंघटित, निवडक आणि कायदेशीर समर्थनाने सुसज्ज असणे हे ब्रँड पोझिशनिंग सुधारण्यासाठी महत्वाचे आहे.
जर मार्गदर्शनाचे पालन केले नाही तर संभवत: होणार्या हानीची माहितीही फ्रँचाइझला असणे महत्वाचे आहे. कारण ह्यामुळे जनतेतील ब्रँडची विश्र्वासार्हता घटु लागेल.
छोट्या आणि मध्यम व्यवसायांबाबत बोलायचे झाले तर फ्रँचायझिंगचे मार्गदर्शन समजुन घेणे महत्वाचे आहे. बाजारातील टिकाऊ ब्रँड निर्माते बनवु शकणारी कारणे त्यांनी आपल्या व्यवसायात समाविष्ट करायला हवीत.
फ्रँचायझिंगची प्रक्रिया फार क्लिष्ट आहे तसेच ह्यात खूप प्रक्रिया येतात. फ्रँचायझी अनुमोदन करारापासुन ते इतर कागदपत्रांत अॅक्सेस मिळविण्यापर्यंत खूप काही येत जे फार वेळ खाऊ असतच आणि प्रक्रियाही वेळकाढु आहेत.
योग्य निवडीचे महत्व
फ्रँचाइझ निवड प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची आहे. म्हणुनच आपल्याला मिळालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी आपल्याकडे योग्य निकष असणे महत्वाचे आहे. प्रत्येक अर्जदाराची, कौटुंबिक आणि व्यावसायिक पार्श्र्वभूमी, सामाजिक पत, आर्थिक पाठिंबा, टीम निर्मीतीची मानसिकता आणि इतर पुष्कळ काही, अशा घटकांच्या आधारावर छाननी केली पाहिजे. “फ्रँचायझी निवड हे लग्न करण्यासारखेच आहे”. योग्य निवड आपल्याला खूप पुढे नेईल तर चुकीची निवड मागे नेईल!
सोपे विपणन नियम बनवा
फ्रँचाइझ ब्रँडचे वेगळे वैशिष्ट्य निर्माण करण्यासाठी सोपे नियम नेहमीच आघाडीवर असतात. ब्रँडचे चांगले प्रमोशन होण्यासाठी पूरक असलेल्या मार्केटिंग टूल्सचा वापर करावा आणि अथक प्रयत्नांची जोड द्यावी. नियमित जाहिराती मोहिमा, सोशल मिडीयावर अवेयरनेस तयार करणे हे काही मार्ग आहेत जे व्यावसायिक वापरु शकतात. एक ब्रँड म्हणुन जेव्हा आपण फ्रँजायझिंगसाठी जाता तेव्हा व्यवस्थापन आणि जाहिरातबाजी ही मजबुत आहे कि नाही ह्याचा विचार जरुर करावा. हे नेहमीच लक्षात ठेवा कि फ्रँचायझेज नेहमीच काम करण्याच्या डीआयवाय थियरीवर विश्र्वासतात. जर एक मालक म्हणुन आपणांस आपल्या ब्रँडचे फ्रँचाइझ करायचे असेल तर आपण आपले स्वत:चे डिजिटल मार्केटिंग आणि मॅनेजमेंट टूल्स निर्माण करु शकता.
छापील जाहिराती, बॅनर्स, पीओपी मटेरियल्स, इंसर्टस, जाहिरातींचे रंग वगैरे सारख्या जाहिरातीच्या अन्य पैलुंचाही वापर करु शकता. एक ब्रँडिंग स्ट्रॅटेजी म्हणुन डीआयवाय ही चांगली वापरली जाणारी पद्धत आहे कारण आपला कस्टमर बेस ह्याकडे जास्त आकर्षित होत असतो.
वाढीव भावनिक जवळीक
ब्रँड मॅनेजमेंट आणि फ्रँचाइजचा गाभा ह्यात चांगले संतुलन राखता यायला हवे. एक ब्रँड म्हणुन आपण थेट आपल्या फ्रँचायझीजशी भावनिक संबंध जुळवुन ते राखले पाहिजेत. म्हणुनच चांगली कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी राबवायला हवी. जर आपण ब्रँड सेलिब्रेट करण्यासाठी व्हिडीयो काढणार असाल तर फ्रँचायझीजना त्यातील हिरोच्या रुपात दाखविल्याने फारच फरक पडेल.
तर अशा ठराविक मार्गांनी आपण एक यशस्वी फ्रँचायझींग ब्रँड तयार करु शकता. मात्र आपल्याला फ्रँचाइजच्या मानक कार्यप्रणाली (एसओपी – स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) चे तसेच दीर्घ कालावधीसाठी ह्यास यशस्वी करण्यासाठी फ्रँचाइझलाही ह्याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
युवररिटेलकोच एसओपी, बाजार संशोधन आणि व्यवसाय योजना सल्लामसलत पुरवितात, जुडण्यासाठी [email protected] वर इमेल पाठवा अथवा +91-9860-426-700 वर कॉल करा.
एसोपीजने डॉक्टरांना मदत | फर्निचर शोरुमसाठी एसोपी | क्यूएसआर साठी एसओपी | कपड्यांच्या ब्रँडसाठी एसओपी | फ्रँचाइझ व्यवसायवर्धनासाठी एसओपी | सहा चरणात रिटेलसाठी एसओपी | मार्केटिंगसाठी एसओपी ह्या विषयांशी संबंधित अधिक लेख (इंग्रजीत) वाचण्यासाठी कृपया त्या विषयावर क्लिक करा.