पोशाख | फॅशन | कपडे
-
फॅशन आणि पोशाख क्षेत्रातील आव्हाने
#१. आंतरराष्ट्रीय स्पर्धा:
किरकोळ बाजारात जागतिक फॅशनमध्ये विदेशी ब्रँडसचे वर्चस्व असताना ह्या अतिस्पर्धात्मक आणि फारच गजबजलेल्या बाजारात नविन ब्रँडला स्वत:ची ओळख तयार करावी लागते. पोशाख उद्योगाची सांख्यिकी दर्शविते कि जागतिक उद्योगांनी दिलेल्या आकर्षक सूटींमुळे आणि वरिष्ठ दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवुन बाजारातील वर्चस्व कसे निर्माण केले आहे. त्यांचे चांगल्या प्रतीचे उत्पाद आणि संघटित धोरणे, प्रक्रिया आणि प्रणालीने खरेदीदारांची मने जिंकली आहेत. तर आपण आपल्या फॅशन नावाचा किंवा आपल्या कपड्याच्या व्यवसायाचा विस्तार करु ईच्छिताहात तर आंतरराष्ट्रीय मानकांना पूर्ण करुन नाविन्यपूर्णतेने फॅशन ब्रँड सुरु करावा लागेल.
कपडे आणि पोशाख व्यावसायिकांना, खास करुन तयार कपड्यांच्या, उद्योगात जागतिक स्पर्धेत आणि विदेशी ब्रँड समोर टिकाव धरता येत नाही, हे मोठेच आव्हान असते.
उच्च फॅशनच्या रिटेलर्सनाही, बर्बेरी, झारा आणि एच आणि एम सारखे आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडस ऑनलाईन खरेदीचा मार्गही मोकळा करुन देत असल्याने, इकॉमर्सचे आव्हानही स्वीकारावे लागते. कपडे आणि पोशाखातील आंतरराष्ट्रीय प्रगत तंत्रज्ञान तसेच नविनोत्तम कल यामुळे चटकन कालबाह्य होणार्या फॅशन्सचाही फटका बसतो.
तसेच ईच्छुक खरेदीदारांना विदेशी ब्रँडसचे कपडे किंवा पोशाख करण्यात इभ्रतीचे एक वर्धित मूल्य मिळते, हे ही नजरेआड करुन चालणार नाही.
#२. किरकोळ साठा व्यवस्थापन:
फॅशन उद्योगासमोर सध्या कालबाह्य साठ्याचे व्यवस्थापन हाही मोठाच अडथळा आ वासुन उभा आहे. खासकरुन छोट्या फॅशन आणि कपड्यांच्या व्यवसायांना लॉजिस्टिक्स आणि गोदामांच्या समस्यांसह साठा व्यवस्थापनाची चिंताही सतावते आहे. अंदाज आणि विश्र्लेषण करुन साठा करणे ही इष्टतम साठा व्यवस्थापनाची प्रभावी गुरुकिल्ली आहे. पण योग्य व्यवस्थापनाच्या अभावी, कपडे आणि पोशाखाचे ब्रँडस ह्या आघाडीवर मार खातात. फॅशनचे कल आणि तंत्रज्ञान सातत्याने बदलत असते. ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे ब्रँड निर्माण करण्यासाठी साठा आणि माल साठवण व्यवस्थापन फारच प्रभावी असणे महत्वाचे आहे. मोठ्या रिटेलर्सना हे कळुन चुकलय कि फॅशन रिटेल दुकानांसाठी प्रक्रिया मॅन्युअल्स आणि सामान्य कार्यसंचालन प्रक्रिया असणे हे अति आवश्यक आहे. नविनच फॅशन इकॉमर्स व्यवसाय सुरु करणार्यांनी, प्रभावी पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स आणि साठा व्यवस्थापनास त्यांच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग म्हणुनच विचार करावा.
#३. प्रगत तंत्रज्ञानाची गरज:
भुरट्या चोर्या कमी करण्यासाठी किंवा साठ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठीही असो, कपडे आणि पोशाखांच्या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचे महत्व फारच मोठे आहे. कालबाह्य तंत्रज्ञानाच्या वापराने कापडाची प्रत तसेच उत्पादन मानकेही कमी भरतात. पोशाख आणि कपड्यांच्या देशी कंपन्यांना व्यवसायाचे आधुनिकीकरण तसेच विस्तार ह्या गंभीर चिंता सतावत आहेत. म्हणुन जर आपण एखादे नविन बुटिक दुकान उघडण्याचा किंवा आपल्या फॅशन व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करीत असाल तर रिटेल कामांसाठी मॅन्युअल्स किंवा एसओपी (Standard Operating Procedures – मानक कार्यसंचालन प्रक्रिया) ह्या आपल्या किरकोळ व्यवसायाच्या आयोजन तसेच वाढीसाठी प्रमुख आवश्यकता आहेत असे जाणुन घ्यावे.
#४. असंघटित किरकोळ कार्ये:
भारतातील कपडे आणि फॅशन क्षेत्रावर असंघटित आणि फक्त पारंपारिक प्रकारेच व्यवसाय चालविण्याचा फारच नकारात्मक परिणाम झालेला आहे. पोशाख क्षेत्राची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना आणि आधुनिक उत्पादन यंत्रे ह्यावरही मोठ्या प्रमाणातील गुंतवणुक आवश्यक आहे. भारतीय कपडे आणि पोशाख क्षेत्रातील ९३% व्यवसायात असंघटीत क्षेत्र आणि प्रत खात्रीच्या समस्या तसेच निकृष्ट दर्जाची उत्पादन यंत्रे वापरणार्या कालबाह्य कपड्यांच्या कारखान्यांवर कापडासाठी पोशाख कंपन्यांचे अवलंबुन असणे ज्यामुळे ह्या उद्योगावर असंघटिततेचा आणि नियमांच्या अभावाचा फारच नकारात्मक परिणाम झाला आहे.
#५. पूर्ण स्वरुपच बदलणार्या ब्रँड पावरसह नविन कंपन्या:
नविन संघटित खाजगी नावांचे फॅशन ब्रँडस जुन्या पारंपारिक ब्रँडसची जागा घेत असुन स्पर्धा वाढवित आहेत. ह्या बाजाराची व्याप्ती खूपच मोठी असल्याने संघटीत आणि आंतरराष्ट्रीय कपडे तसेच पोशाखांचे किरकोळ विक्रेतेही भरभराट पावत आहेत. उत्कृष्ट प्रत व्यवस्थापन आणि प्रमाणित आखलेल्या प्रक्रियांमुळे आधुनिक फॅशनचे किरकोळ विक्रेते असंघटीत क्षेत्रास चीतपट करीत आहेत.
योग्य प्रक्रिया, प्रणाली आणि कार्यपद्धती राबवुन नामांकित किरकोळ कपडे विकणारी खासगी नावे त्यांचा व्यवसाय जागतिक तसेच राष्ट्रीय बाजारातही विस्तारत आहेत. आधुनिकीकरण आणि विविधीकरणाद्वारे ग्राहकांना निवडीची श्रेणी पुरविण्यासाठी हे ब्रँडस व्यावसायिक व्यवस्थापन करवितात.
#६. विस्तारासाठी फॅशन स्ट्रॅटेजी बनविणे:
उत्पाद विविधीकरण करुन त्यांच्या उत्पादाचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी फॅशन कंपन्यांना आणि कपड्यांच्या किरकोळ क्षेत्रात उत्तेजन दिले जात आहे. ह्यामुळे उत्पाद प्रत, उत्पादकता आणि विपणन प्रयत्न चांगलेच सुधारतील. तसेच किरकोळ विक्रेत्यांना जागतिक बाजारात उत्पाद विक्रीसाठी त्यांच्या उत्पादांची श्रेणी व्यापक करावी लागेल उदा. मानवनिर्मित धाग्यांनी बनविलेल्या कपड्यांचा समावेश करणे.
देशी आणि आयात केलेल्या कृत्रिम धाग्यांनी फॅशन निर्मिती करणारे, कपडे आणि पोशाखाच्या किरकोऴ क्षेत्रात एक नविन पातळी निर्माण करण्यात मदत करतील. ज्या ब्रँडसना वाढायचेय त्यांनी, उत्पादांची प्रत, विपणन प्रभाव आणि व्यवस्थापन प्रक्रिया तसेच कार्यपद्धतीत मोठाच सुधार करायला हवा.
उत्पादांचे मिश्रण बदलुन, भंडारण, लॉजिस्टिक्स आणि कार्यप्रणालींच्या सुधारावर लक्ष दिल्याने पोशाखांच्या कंपन्यांना आघाडीची मुसंडी मारता येईल. चीन आणि भारतासारख्या संवेदनशील किंमतीची बाजारपेठ मोठी असल्याने अशा बाजारात तग धरण्यासाठी पोशाख कंपन्यांना स्पर्धात्मक दर राखावे लागतात.
कार्यप्रणाली आणि कालबाह्य उत्पादन यंत्रांचे आधुनिकीकरण करुन ग्राहकांना किंमतीचे मूल्य देण्यावर विस्ताराचे लक्ष केंद्रीत असले पाहिजे. अंदाजित ४ टक्के वाढ दरासह वर्ष २०२५ पर्यंत जागतिक पोशाख बाजार मूल्य २.६ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोचण्याची अपेक्षा केली जात आहे, पश्र्चिम यूरोप, चीन, अमेरीका आणि भारतासारख्या अर्थव्यवस्था ह्या वाढीच्या मुळाशी असतील.
#७. रिटेल ऑम्निचॅनल स्ट्रॅटेजी
डिजिटल युगात बहुआयामी दृष्टीकोन बाळगणे महत्वाचे आहे. एमकॉमर्स (मोबाईल कॉमर्स) आणि फॅशनचे इकॉमर्स मॉडेल्स लोकप्रिय होत असताना ऑम्निचॅनल दृष्टीकोन राबविणे हे पोशाख आणि कपड्यांच्या उद्योगात फारच महत्वपूर्ण बनत आहे. बांधीव दुकानांच्या पारंपारिक किरकोळ दुकानदारांनी स्मार्टफोन्सच्या सुविधेसह सेल्फ चेकआऊट कियॉस्क तसेच बिकन तंत्रज्ञानाचा समावेश करायला हवा तर इकॉमर्स किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्या पारंपारिक बाजारातील उपस्थितीचाही विचार करायला हवा. ह्या संदर्भात व्यवसायातील दरी लांघणे हेच महत्वाचे आहे.
II) आपल्या व्यवसायात वायआरसी कशी मदत करतील
बॅक ऑफिस, फ्रंट ऑफिस, ऑर्डर पूर्तता आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन सल्ला ह्याबाबत बोलायचे झाले तर वायआरसी फॅशन रिटेल सल्लागार हेच मुख्य स्तंभ आहेत ज्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना झपाट्याने आणि सातत्याने विस्तार करता येतो. एक व्यवस्थापन सल्लागार कंपनी म्हणुन आमच्याकडे वैचारिक नेते, किरकोळ व्यवसाय तज्ञ आणि स्ट्रेटेजिस्ट आहेत, ह्या आणि अशा बर्याच कारणांसाठी भारतातील वायआरसी (युवर रिटेल कोच) ही फॅशन सल्लागार कंपनी आपल्या लक्झरी आणि फॅशन व्यवसायांच्या विस्तार आणि वाढीसाठी योग्य उपाय देते. फॅशन किरकोळ व्यापार्यांनी, स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील भरभराटीसाठी संभवित वाढीचा पूर्ण फायदा उठविणे फार महत्वाचे आहे. फॅशन आणि लक्झरी किरकोळ क्षेत्रातील वाढ तसेच विस्तार संधींचा फायदा घेण्यासाठी, कपडे आणि पोशाखांच्या किरकोळ उद्योगातील एक अनुभवी दिग्गज अशा वायआरसी फॅशन सल्लागार कंपनीकडे जरुर या. जर आपणांस पोशाखातील सखोल तसेच खाचाखोचा समजावुन सांगणारा सल्ला हवा असेल तर वायआरसी रिटेल सल्लागारांशी जरुर बोला. अगणित नविनच सुरु झालेल्या रिटेल व्यवसायांना भौतिक रिटेल दुकाने तसेच फॅशन इकॉमर्ससाठी फ्रँचायझी व्यवसाय मॉडेल्स निर्मिती आणि ह्या आणि अशा सर्वच कार्यांसाठी एसओपीज (मानक कार्यसंचालन प्रणाली) तयार करुन राबविणे ह्या सर्वांसाठी फॅशन व्यवसाय सल्ल्यातील वायआरसी हे स्ट्रॅटेजिक सहभागी आहेत. परफेक्ट कपडे निर्मिती प्रक्रियेच्या ऑप्टिमायझेशनपासुन ते, फॅशन रिटेलचा ऑनलाईन सेट-अप तयार करणे आणि रिटेल चेन सल्ला वगैरे पर्यंत आपल्या रिटेल व्यवसायात विविध प्रकारे वायआरसी मदत करु शकतात.
III) पोशाख, फॅशन आणि लक्झरी रिटेल उद्योगाबाबत
जगभरातील सर्व उद्योगात पोशाख, फॅशन आणि लक्झरीचा रिटेल उद्योग हा सर्वात झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. पोशाखाचा उद्योग हा वार्षिक पातळीवर २०१९ ते २०२३ पर्यंत ४.६ टक्के CAGR ने वाढीस सज्ज आहे. संशोधन अस सांगत कि ह्यातील मोठ्ठा भाग महिला आणि मुलींच्या कपड्यांनी व्यापलाय. वर्ष २०१९ मध्ये ह्या क्षेत्रात महसूलाचा विक्रम नोंदविला गेलाय. हा रिटेल उद्योग दरवर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढतोय. झारा, एच अँड एम तसेच मार्क अँड स्पेन्सरसारखे फारच थोडे जागतिक ब्रँडस त्यांच्या स्पर्धात्मक किंमती, उत्पाद प्रत, ब्रँडींग स्ट्रॅटेजी आणि मजबुत कार्यसंचालन प्रणालीसह पोशाख आणि कपड्यांच्या जागतिक बाजारात स्पष्टपणे आघाडीवर आहेत.
ग्राहकांच्या वाढत्या श्रेण्या आणि खर्च करण्यासाठी मुबलक पैसा ह्यामुळे कपडे आणि पोशाखाच्या उत्पादांना चांगलीच मागणी आहे. वाढत्या संख्येने तरुण शहरी ग्राहक आणि चौकोनी एकेकटी रहाणारी कुटुंबे तसेच वांच्छा यामुळे फॅशन रिटेल उद्योगाच्या जागतिक मागणीसही चांगलाच जोर मिळालाय.
वाढीचा संभव जबरदस्त आहे. तरीही कपडे आणि पोशाखाच्या क्षेत्रात बरेच अडथळेही आहेत.
आमच्या सेवा
- स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी)
- इआरपी इंटग्रेशन
- फ्रँचाइझ कन्सल्टिंग
- प्रोजेक्ट रिपोर्ट डेव्हलपमेंट
- प्रोसेस ऑडीट
- ट्रेनिंग
पोशाख, लक्झरी आणि फॅशन रिटेलचा सल्ला मिळवा