-
एफएमसीजी उद्योगासमोरील आव्हाने
#१. साठा व्यवस्थापन
एफएमसीजी क्षेत्रातील कठिण आव्हानांपैकी एक आहे साठा व्यवस्थापन. जेव्हा किंमती वाढतात आणि विक्री कमी होते तेव्हा खराब होऊ शकणार्या किंवा हळु विक्री होणार्या साठ्याचे काय करायचे हीच समस्या उभी रहाते. ह्या क्षेत्रातील कंपन्यांना फार मजबुत साठा व्यवस्थापन प्रणाली खासकरुन एआरएस म्हणजेच संपलेल्या मालाची आपोआप ऑर्डर देणारी प्रणाली आणि चांगला सुस्थापित वस्तु ठेवण्याचा आराखडा (प्लॅनोग्राम). साठा व्यवस्थापनात उत्कृष्टता साध्य करण्यासाठी पुष्कळसे एफएमसीजी / सुपरमार्केट व्यवसाय हे युवर रिटेल कोच सारख्या सुपरमार्केट सल्लागारांवर अवलंबुन असतात, जे शिकण्याचा काळ कमी करुन झटकन लक्ष्य साध्य करण्याची सुविधा देतात.
#२. ब्रँड बिल्डिंग आणि कनेक्ट
एफएमसीजी क्षेत्रात ब्रँड निर्माण करुन त्यास बढावा देणे तसेच ग्राहकांशी संपर्कात रहाणे हे फारच महत्वाचे बनत आहे. जरी विपणनाचे लक्ष्य नेहमीच ग्राहकांशी चांगला संपर्क राखण्याचे असते तरी ज्या पद्धतीने तो संपर्क साधला जातो त्याने फरक पडतो. ग्राहकाशी संपर्क साधण्याचे नवनविन मार्ग आणि संधी कशा मिळवायच्या हे समजणेही तितकेच महत्वाचे आहे. कंपन्यांना ग्राहकांचा विश्र्वास जिंकता यायला हवा आणि संपर्कानंतर जवळिक तसेच नाते मजबुत करण्यासाठी विविध चॅनेल्सचा उपयोगही करायला हवा. तेव्हाच त्यांचा ब्रँड वजनदार होऊन वाढेल.
#३. तक्रार व्यवस्थापन
ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारी वेळेत हातावेगळ्या करणे हे ग्राहक वस्तुंच्या व्यवसायासाठी फारच महत्वाचे आहे. सध्याची सामाजिक माध्यमातील गतिविधी आणि पारदर्शकता यातुन येणारे वाईट रिव्ह्यूज किंवा रेटिंगमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला काही सेकंदातच धक्का लागू शकतो. ग्राहकांशी, मजबुत, विश्र्वासावर आधारीत मूल्यवान नाते जोडण्यात त्यांच्या समस्यांचे निराकरण जितक्या लवकर होईल तितके लवकर करणे आणि अशा नकारात्मक परिस्थितीला किंवा तक्रारीकडे वाढीची संधी म्हणुन पहाणे ही येते.
#४. उत्पाद विक्रीतील कमी मार्जिन
उत्पादावरील कमी मार्जिन आणि व्यवसाय चालविण्याचा जास्त खर्च ह्यामुळे मोठ्या उलाढाली कराव्या लागतात अन्यथा एफएमसीजी व्यवसाय खालीच बसेल.
#५. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन
सुपरमार्केटस आणि एफएमसीजी क्षेत्रासमोर लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता हे मूळ आव्हान असते. एफएमसीजी क्षेत्राचे स्वरुपच असे असते कि पुरवठा सातत्याने व्हावा लागतो आणि वार्षिक मोसमी चढउतारांचे शिखर ४००% पर्यंत पोचु शकते ज्यास शोषण्याची क्षमता असावी लागते. तसेच, नाजुक किंवा नाशवंत स्वरुपाच्या उत्पादांचा वापर कालावधीही फारच कमी असुन ग्राहकांचा कलही बदलता असतो. किंमती आणि वाढीचे अर्थकारण यांची सांगड बसविण्यासाठी वरील सर्व कारणांमुळे सातत्याने पुरवठा साखळीची कार्यक्षमता धसास लागते.
ऑनलाईन किराणा आणि ऑनलाईन सुपरमार्केटच्या किरकोळ विक्रेत्यांसाठीच खासकरुन पुरवठा साखळ्या आणि लॉजिस्टिक्स ह्यांची महत्वाची भूमिका आहे, ज्यात फक्त लॉजिस्टिक्समुळेच ग्राहकांचे ४५% असमाधानी रिव्ह्यूज येऊ शकतात तर उरलेले ५५% उत्पाद आणि अन्य सेवेशी संबंधित असु शकतात. म्हणुन एफएमसीजी इकॉमर्समध्ये पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्सचे सुपरमार्केट कार्यप्रणाली मॅन्युअल ही निवड राहिली नसुन गरज बनली आहे.
एफएमसीजी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी सातत्याने बदलणार्या ह्या स्पर्धात्मक उद्योगात रहाण्यासाठी, गोदाम, कार्यप्रणाली आणि पुरवठा साखळीचा पुन्हा विचार करावा तसेच ग्राहकांना गरजेप्रमाणे सेवा पुरवावी. ह्या स्पर्धात्मक टोकाच्या दृष्टीकोनास एफएमसीजी क्षेत्रामधील मोठ्या कंपन्यांच्या गोदाम कार्यप्रणालीत पाहिले जाऊ शकते. जसे किरकोळ दुकानदारांनी पुरवठा साखळीची पुनर्रचना केली आहे तसेच एफएमसीजी उत्पादही सेवा पातळीवरील मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मालाची उलाढाल करतात. साठवणीच्या जागेचा वापर इष्टतम प्रकारे करणे हे ही मोठेच आव्हान असते ज्यामुळे एजीव्हीएस, एएसआरएस आणि मोबाइलद्वारे चलित समाधान उपायांचा वापर प्रगत होत आहे.
#६. नाजुक वस्तुंचे व्यवस्थापन
एफएमसीजी क्षेत्रात नाजुक किंवा नाशवंत वस्तुंचे व्यवस्थापनाचेही आव्हान असते. काळजीपूर्वक केलेल पॅकेजिंग आणि नाजुक वस्तुंची हाताळणी हे महत्वाचे मुद्दे ठरतात.
#६. ग्राहकास राखण्यासाठी सीआरएम
फारच स्पर्धात्मक आणि बदलत्या व्यवसाय वातावरणामुळे एफएमसीजी क्षेत्रात ग्राहकांना फक्त आकर्षित करण्याचेच नव्हे तर त्यांना राखण्याचीही गरज निर्माण झाली आहे. म्हणुन अगणित ग्राहक बेस बनवुन त्यातील प्रत्येकाशी संपर्क राखुन दीर्घकालावधीचे नाते जोडण्याची गरज आहे. ह्यातुनच सीआरएम किंवा ग्राहक नाते व्यवस्थापनाचा जन्म झालाय. विपणन संबंधाच्या तत्वावरच सीआरएम आधारीत आहे. ग्राहकांचे निर्माण, विकसन, वृद्धी आणि नाते राखणे आणि दीर्घकालीन ग्राहक मूल्य वर्धन तसेच संस्थात्मक नफा हेच ह्यांचे लक्ष्य असते.
वाढीव नफ्यासाठी ग्राहकांचा अनुभव समृद्ध करुन, समाधान बाणविणे आणि त्यांचा विश्र्वास जिंकणे हे ही लक्ष्य आहे. एफएमसीजी उद्योगात सीआरएम ही एक व्यवसाय स्ट्रॅटेजी असुन जिच्या वापराने मोठे आरओआय (निवेशावरील परतावा) मिळविले जाऊ शकतात. उत्पादाच्या प्रभावी विक्रीस, सेवेस, प्रक्रिया आणि विपणनात मदत करण्यासाठी ग्राहक केंद्रीत व्यवसाय दृष्टीकोनास ह्यात अनुकूलित केले जाते.
#७. ऑम्निचॅनेल दृष्टीकोन वापरणे
ह्यावेळी विविध ऑनलाईन तसेच ऑफलाईन चॅनेल्समधुन ग्राहकांच्या मतांनी ब्रँडची अस्सल प्रतिमा बनणे हे ही महत्वाचे आहे. ऑम्निचॅनल दृष्टीकोनात वेबसाईट चॅनेल्स, इकॉमर्स मॉडेल्स आणि पारंपारिक दगडा-विटांची बांधीव दुकाने आणि बरेच काही येते, जेणेकरुन एकात्मिक विपणन संप्रेषणाची सुविधा मिळते आणि ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या चॅनेलवरील एफएमसीजी पुरवठादार निवडण्याची संधी मिळते. ऑम्निचॅनेल रिटेलिंगची सुविधा देण्यासाठी आपल्याला सुपरमार्केटच्या कार्यप्रणालीसाठी रिटेल अनुभवाचे सल्लागार लागतील ज्यांना नविन उपाय समजतील. एफएमसीजी सल्लागार वस्तु विक्रीच्या व्यवसायास आव्हाने पार करण्यात आणि ग्राहक अनुभव समृद्ध करण्यात मदत करतात.
-
वायआरसी: एफएमसीजी क्षेत्रातील वाढीसाठी आपला स्ट्रॅटेजिक पार्टनर
जर आपणांस ऑनलाईन किराणा दुकान चालू करायचेय किंवा आपली स्वत:ची सुपरमार्केट साखळी निर्माण करायचीय, तर विश्र्वासु सुपरमार्केट सल्लागार निवडण्याची वेळ आलीय. वायआरसी ही पुष्कळशा ऑनलाईन तसेच ऑफलाईन रिटेलर्सची आवडती निवड आहे, सीपीजी व्यवसाय विश्र्लेषण असो किंवा वस्तु विक्रीच्या सुपरमार्केटचा विस्तार असो, ह्यातील चांगल्या अनुभवी स्ट्रॅटेजिस्टची आपणांस गरज आहे.
एफएमसीजी क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणात नामांकित एफएमसीजी सल्लागारांचीच गरज असते. आता कोणता एफएमसीजी सल्लागार निवडावा जेणेकरुन आपल्या विविध गरजांची पूर्णता होईल असा विचार करीत असाल तर वायआरसी, रिटेल सल्लागारांशी जरुर बोला. युवर रिटेल कोचना कल माहिती असल्याने अंदाज बांधता येतो आणि जसा एफएमसीजी उद्योग विकसित होत आहे त्याप्रमाणे त्यात वापरले जाणारे तंत्रज्ञानही माहिती आहे.
हे नामांकित सल्लागार, एफएमसीजी मधील व्यवस्थापनात मदत करतात. त्यांच्या मदतीने एफएमसीजीचे ब्रँड मूल्याचा लाभ घेऊन मोहिमा, व्यापार उपक्रम आणि विक्री प्रणालीचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी रिटेल दुकानांसाठी मानक कार्यसंचालन पद्धतीं राबवुन व्यवसाय वाढविण्यात मदत मिळते. रिटेल कार्यपद्धती सल्लागार, वायआरसी, हे मजबुत रिपोर्टिंग प्रणालीची खात्री करवितात आणि एफएमसीजी व्यवसाय विस्तारात “व्यवसाया ३-एस” म्हणजेच कर्मचारी, साठा आणि विक्री यावर लक्ष ठेवण्यात रिटेल प्रक्रिया मॅन्युअल्सचा वापर करुन मदत करतात.
-
एफएमसीजी उद्योगाबाबत
एफएमसीजी म्हणजे “चटकन विक्री होणार्या वस्तु” आणि सीपीजी म्हणजे “विक्रीसाठी पॅकेज्ड वस्तु” ज्यांची विक्री दररोज होते किंवा दररोजच्या वापरातील वस्तु. एफएमसीजी क्षेत्रातील प्रत्येक उत्पादाची किंमत ही वापरावर अवलंबुन असल्याने एफएमसीजी क्षेत्रात ग्राहकांची मोठीच भूमिका असते. वनौषधि आणि नैसर्गिक उत्पाद विभागात सातत्याने, निरंतर आणि पुष्कळच वाढ होत असल्याने आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांनी सुरु केलेल्या नवनविन लाँचेसला उधाण आलेय. आर्थिक मोकळिक आणि पारदर्शी धोरणांनी अर्थव्यवस्थेस, चटकन संपणार्या वस्तुंच्या ओघाकडे वळविले आहे. डेलॉइटच्या अहवालानुसार, वैश्र्विक वाढीत एफएमसीजी क्षेत्राचा मोठ्ठाच हात आहे. अहवाल पुढे म्हणतो कि वर्ष २०२०-२०२३ पासुन ह्या क्षेत्रात प्रभावी सीएजीआर वाढ दिसुन येईल. तर जर आपण किराणा दुकान किंवा ऑनलाईन सुपरमार्केट उघडण्याचा विचार करीत असाल कि “सुपरमार्केट व्यवसाय कसा चालू करावा”, तर आत्ता वाढ असीमित असतानाच ते करा पण आव्हानेही तशीच असतील.
बदलती जीवनशैली, वाढीव आय आणि सोपा अॅक्सेस ह्या सर्वांनी ह्या क्षेत्राच्या वाढीस हातभार लावलाय. भारतीय एफएमसीजी क्षेत्रातुन एकुण निर्माण होणार्या राजस्वातील ५५% हे फक्त शहरी विभागातुन येताहेत. पुढे भारतातील फक्त रिटेल बाजारही २०२१ पर्यंत १.१ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे जो २०१७ ला ८४० बिलियन डॉलर्स होता. ह्यामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या नफा चांगलाच वाढेल कारण आधुनिक विक्री ही दर वर्षी सुमारे २०-२५ टक्क्यांनी वाढते आहे.
चटकन संपणार्या वस्तुंनी ती मूलभूत भाग व्यापलेत – खाद्य आणि पेय, ज्यातुन विभागाच्या एकुण राजस्वातील १९% येतात, तर स्वास्थ्य काळजी दुसरे ३१% पुरविते आणि घरी वापरातील आणि वैयक्तिक वापरातील वस्तुंनी उरलेले ५०% व्यापलेत.
एफएमसीजी क्षेत्र २०२१ पर्यंत २७.८६ च्या सीएजीआर ने वाढेल. एफएमसीजी कंपन्याही उर्जा कार्यक्षम कारखाने आणि खाद्य पार्क ह्यामध्ये, क्षमता विस्तार तसेच देशी बाजाराचे अधिग्रहण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निवेश करण्यास तयार होत आहेत. एफएमसीजी क्षेत्रातील निवेश, साखर, खाद्य प्रक्रिया, सौंदर्यप्रसाधने आणि कागदी लगद्याच्या उद्योगांवर केंद्रीत असतो.
आमच्या सेवा
- स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स (एसओपी)
- इआरपी इंटग्रेशन
- फ्रँचाइझ कन्सल्टिंग
- प्रोजेक्ट रिपोर्ट डेव्हलपमेंट
- प्रोसेस ऑडीट
- मिस्टरी शॉपिंग
- ट्रेनिंग
सुपरमार्केट आणि ऑनलाईन किराणा व्यवसायासाठी सल्ला मिळवा