ऑनलाईन नीश, सांख्यिकी आणि चरण जे प्रत्येक उद्यमीला माहिती हवेत !!!
दागिने ही काही स्त्रियांचीच मक्तेदारी राहीलेली नाही. बदलत्या काळाच्या ओघात पुरुषही दागिने खरेदी करु लागलेत, ऑनलाईन तसेच ऑफलाईनही. स्टॅटिस्टाप्रमाणे इंटरनेटवरील जागतिक खरेदीचा २९% हिस्सा दागिने आणि अॅक्सेसरीजने व्यापलाय.
ह्याव्यतिरिक्त अलिकडील अंदाजाप्रमाणे, साल २०२३ ला दागिन्यांच्या जागतिक ऑनलाईन विक्रीचे बाजार मूल्य ३४० बिलियन डॉलर्सपर्यंत पोचेल तर साल २०३५ ला ६४५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोचण्याचा संभव आहे. वाढीची अशी आकडेवारी पाहून दागिन्यांच्या ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा बाळगणार्या उद्यमींना प्रोत्साहन मिळत आहे. पण पुरेस ज्ञान आणि योजना तयार नसताना जर व्यवसायात पाऊल ठेवले तर गाशा गुंडाळावा लागण्याचीच शक्यता जास्त असते.
ज्यांना दागिन्यांची ऑनलाईन विक्री व्यवसायाच्या संभविततेची खात्री आहे पण स्पष्टता तसेच अधिक माहिती शोधताहेत, त्यांना ह्या ब्लॉगने चांगलीच मदत मिळेल. संभवित उद्यमींना दागिन्यांचा ऑनलाईन व्यवसाय सुरु करण्याच्या योजना टप्प्याशी संबंधित महत्वाच्या प्रश्र्नांच्या उत्तरांचे एक लिखित मार्गदर्शन म्हणुन हा लेख लिहिण्याचा खटाटोप आहे. दागिन्यांच्या ऑनलाईन दुकानाच्या योजनेतील गूढ उकलुन दाखविण्यासाठी ह्या ब्लॉगची ३ ढोबळ वर्गवारी केली आहे :
- मागणीचा अंदाज बांधणे: गंमतीची गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या व्यवसायातही दागिन्यांतील छोटी-छोटी वैशिष्ट्ये आहेत जस कि सोन, खोटे दागिने, पुरातन आणि इतरही पुष्कळ प्रकारचे दागिने. एक उद्यमी म्हणुन कोणत्या निवेशावर चांगला परतावा मिळेल ह्याचा विचार करुन कोणते उत्पाद उत्कृष्ट आहे हे आधी ठरवायला हव. एकाच प्रकारचे दागिनेही विकू शकता किंवा दागिन्यांची पूर्ण श्रेणीही हाताळली जाऊ शकते. हे एकदा ठरवल कि मग आपल्या उत्पादाला ऑनलाईनवर किती मागणी असु शकते ह्याचा अंदाज बांधावा लागतो. गुगल आणि अमेझॉनद्वारा दिलेली टूल्स वापरुन असा अंदाज बांधणे सोपे असते.
गुगल तसेच अमेझॉन ही दोन्ही ऑनलाईन व्यवसायातील प्रचंड मोठी नावे आहेत आणि इकॉमर्स व्यवसायात फारच प्रभावशाली आहेत. पहिले टूल आहे गुगल ट्रेंडस, जे गुगल सर्चवर नेहमीच्या वापरकर्त्यांनी वापरलेल्या लोकप्रिय कीवर्डसचा अचूक डेटा पुरवु शकते. ह्या कीवर्डसचा थेट संबंध ऑनलाईन उत्पादांच्या मागणीशी आहे. ह्याहीपुढे जाऊन ठराविक भागात (उदा. देश, राज्य, शहर) एकाद्या उत्पादाच्या मागणीस फिल्टर करुन त्यावर नजरही ठेऊ शकता. पुढचे टूल, कीवर्ड टूल डॉमिनेटर (केटीबी) हे अमेझॉनसाठी बनविलेले आहे आणि हे देशाप्रमाणे उत्पादाच्या मागणीचा डेटा आपल्याला पुरविते. ही दोन्ही टूल्स वापरुन आपल्या ऑनलाईन दुकानात कोणत्या प्रकारचे उत्पाद असायला हवेत ह्याचा अंदाज आपण बांधू शकता.
- स्पर्धकांचे विश्र्लेषण: ऑनलाईन व्यवसायातील पुष्कळसे लोक सुरवात तर करतात पण लगेच बंदही करावा लागतो कारण त्यातील बहुतेकांनी ह्या बाजारातील स्पर्धेचा विचारच केलेला नसतो. बाजारात शिरण्यापूर्वी स्पर्धेची कल्पनाही नसते. खरतर ऑनलाईन व्यवसायातील स्पर्धा समजणे हे फारच सोपे आहे. आपण विकणार असाल ते उत्पाद शोधा आणि पहिल्याच पानावर त्या वस्तु विकणारे ब्रँडस दिसतील, तेच आपले स्पर्धक असतील.
स्पर्धकांच्या विश्र्लेषणाची गोष्ट करायची म्हटली तर ऑनलाईनवर उपलब्ध टूल्सद्वारे ही माहिती आपल्याला सहज मिळुन जाते. ह्या उत्पादांसाठी ट्रॅफिक, लोकप्रिय कीवर्डस, उत्पादाच्या पानांना दिलेल्या कमाल भेटी आणि इतरही बरच काही. ह्यातील पहिल फ्रीमियम टूल आहे उबरसजेस्ट (Ubersuggest) आणि ह्यात स्पर्धकांच्या वेबसाईटवरील चांगले रिझल्ट दाखविणारे कीवर्डस तसेच कमाल भेटी दिलेली पाने, मिळतील. दुसरे टूल आहे सिमिलरवेब (SimilarWeb) आणि ह्यात स्पर्धकांकडील ट्रॅफिकचा स्त्रोत तसेच स्पर्धकांनी वापरलेल्या पेड कीवर्डसचे तपशील दिसतील. ह्याव्यतिरिक्त, एसइएमरश (SEMrush) सारखी पेड टूल्सही आहेत जी स्पर्धेची खास माहितीही देतील.
- वित्तीय व्यवहार्यता: ऑनलाईन व्यवसाय सुरु करताना त्यावर सातत्याने होणार्या खर्चाचाही विचार करावा लागतो आणि सर्वात मूलभूत, सातत्याने होणारा खर्च आहे डिजिटल मार्केटिंगचा. इकॉमर्स ब्रँड जोपर्यंत त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीस डिजिटल मार्केटिंगची जोड देत नाही तोपर्यंत व्यवसाय सफल होण्याचा संभव फारच कमी असतो. म्हणुन व्यावसायिकांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात निवेश करण्याची तयारी ठेवायला हवी.
आता मार्केटिंगमध्येही बाजाराच्या दोन ढोबळ श्रेणी आहेत – रेड ओशन आणि ब्लू ओशन. ज्या बाजारात स्पर्धा फारच मोठी असते आणि फक्त मार्केटिंगसाठी बराच निवेश करावा लागतो त्याशी रेड ओशन संबंधित आहे. ज्या बाजारात स्पर्धा त्यामानाने कमी असते पण वाढीची चांगली संधी असते आणि मार्केटिंगमध्ये कमी निवेश केला तरी चालतो तिथे ब्लू ओशन कामी येतो. आपल्या व्यवसायाची वित्तीय व्यवहार्यता ध्यानात घेण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या बाजारात प्रवेश करीत आहात ते आधी समजुन घेतले पाहिजे.
निष्कर्ष:
ऑनलाईन चौखटीची योजना समजुन घेतल्यानंतर उद्यमींनी आता संभावित नफा, अंदाजे विक्री (किमान पुढील ३ वर्षांसाठी), सुटणारी मार्जिन, संचलनाचा खर्च, मिळणारा परतावा, कर, एकुण आणि निव्वळ नफा तसेच ब्रेक इव्हन विक्री यावर लक्ष केंद्रीत करुन व्यवसाय योजना बनवावी. जेव्हा उद्यमी ह्या सर्व मापदंडांसह व्यवसाय योजना प्रस्तुत करु शकतात तेव्हा ते बाजारात शिरकाव करुन स्पर्धेस तोंड देण्यास तयार असतात.
एक उद्यमी म्हणुन आपण एकट्यानेच हे सर्व करायची गरज नाही पण वायआरसी सारख्या सल्लागारांच्या तज्ञता, ज्ञानी तसेच अनुभवी व्यवस्थापन सल्लागारांसह भागीदारीतुनही केल जाऊ शकत. त्यांच्याकडे इन-हाऊस दागिने सल्लागार आहेत जे आपल्याला ऑनलाईन दागिन्यांच्या व्यसायातील प्रत्येक पैलुत मदत करु शकतात तसेच दागिन्यांच्या व्यवसायासाठी योजनाही बनवु शकतात. याहीपेक्षा, ऑनलाईन दागिन्यांच्या व्यवसायातील स्पर्धेतुनही आपणांस सफलता देऊ शकतात.
संबंधित ब्लॉग्ज
आपल्या स्टॉक मॅनेजमेंटवर ( Stock Management ) आधारीत सॉफ्टवेअर असणे का आवश्यक आहे?
इकॉमर्स व्यवसायाचा विस्तार दुबईत – ७ महत्वाचे विचार
होम डिलिव्हरी सेवेने किराणा दुकानाच्या नफ्यात वाढ